Sunday , December 7 2025
Breaking News

मराठी भाषेतील स्वागत फलक कन्नड संघटनांकडून टार्गेट!

Spread the love

 

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या स्वागताकरिता भाजपाचे माजी आमदार ऍड. अनिल बेनके यांनी स्वागत फलक लावले होते. या स्वागत फलकावरील मजकूर मराठी असल्याने मराठी भाषेची कावीळ असलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर फलक शनिवारी फाडून एक प्रकारे मराठी भाषेचा अवमान केला आहे.

कित्तूर कर्नाटक सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे मराठी भाषेला विरोध करत फलक फाडून मराठी द्वेष्टेपणा दाखविला आहे. 8 डिसेंबर पासून होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामुळे कर्नाटक सरकारचे मंत्री आणि आमदार दहा दिवसांसाठी बेळगावात वास्तव्यास असणार आहेत अशा वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी मराठी भाषेत स्वागत फलक लावले होते. परंतु तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेविरोधातील संकुचित वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. कन्नड संघटनांच्या या कृत्यामुळे मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे. स्वतःला कन्नड भाषा अभिमानी म्हणून घेणारे महेश शिगीहल्ली नामक कार्यकर्त्याने स्वतः केलेल्या या निंदनीय कृतीचे समर्थन करत स्वतःचा शंड शमवून घेतला व या कृत्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करून बेळगाव शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. कित्तूर कर्नाटक सेने या कन्नड संघटनेच्या युवा शाखेचे राज्य अध्यक्ष देवेंद्र तळवार, धर्मांना कांबळे, विद्या कमतगी यांच्यासह यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर निंदनीय कृत्य करून बेळगाव आतील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत भाषिक तेढ निर्माण केला आहे. एरवी मराठी भाषिकांना बेळगावात भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवत वेठीस धरणाऱ्या प्रशासनाकडून ‌या तथाकथित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई होणार याकडे समस्त बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

धर्मांतरासाठी छळ; गृहिणीचा संशयास्पद मृत्यू

Spread the love  रामदुर्ग : अनैतिक संबांधाच्या पार्श्वभूमीतून धर्मांतरासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका गृहिणीचा संशयास्पद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *