
बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती बेळगाव शहरात सध्या पहावयास मिळत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मंत्री महोदय व आमदार आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजी तसेच सुशोभीकरण मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु बेळगाव शहरातील न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी परिसर मात्र कचरा डेपो बनला आहे. या परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा साचला असून वेळेवर कचऱ्याची उचल न झाल्यामुळे न्यू शिवाजी कॉलनी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इथून येजा करत असताना नागरिकांना नाकावर रुमाल धरून चालावे लागते. या कचऱ्याच्या ढिगार्यावर भटकी जनावरे व भटकी कुत्री मोकाट वावरताना दिसत आहेत. वारंवार मागणी करून देखील या ठिकाणचा कचरा वेळेत उचलला जात नाही त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील मूलभूत गरजांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta