
बेळगाव : मागास जातींसाठीच्या आरक्षणाच्या बाबतीत न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालातील उणीवा आणि सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ, तसेच भोवी वड्डर समाजाला 3 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवार दि. 17 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समाजाचे पंचपीठ अध्यक्ष श्री बंगार रंगनाथ स्वामीजी यांनी दिली.
बेळगावमध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने राज्यातील 117 जातींसाठी आरक्षण जाहीर करताना भोवी वड्डर समाजावर अन्याय केला आहे. भोवी वड्डर समाजाला 3 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेंव्हा या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी 17 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर धरणे सत्याग्रह केला जाणार आहे. या सत्याग्रहामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो भोवी वड्डर समाजबांधव सहभागी होणार आहेत, असे श्री बंगार रंगनाथ स्वामीजी यांनी पुढे सांगितले. पत्रकार परिषदेस विठ्ठल वड्डर, महावीर वड्डर, सतीश माती वड्डर, श्रीशैल गाडीवड्डर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta