
बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार निदर्शने केली आहेत. एकीकडे कोल्हापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या बसेस रोखून निषेध केला, तर दुसरीकडे महामेळावा घेण्यासाठी बेळगावात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे समितीकार्यकर्त्यांच्या निदर्शनाचा विरोध करत करवे कार्यकर्त्यांनी बेळगावात निदर्शने करून करवे कार्यकर्त्यांनी अथणीत महाराष्ट्र बसेस रोखून आपला शंड शमवून घेतला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta