
बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील गोकाक जिल्हा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि गोकाक जिल्हा स्थापनेची मागणी करणारे निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी पावले उचलावीत आणि प्रशासकीय आणि विकासात्मक कारणांसाठी गोकाक शहराला जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित करावे अशी मागणी केली. जिल्ह्याच्या विभाजनाबाबत १८ आमदारांना बोलावून त्यांची मते जाणून घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta