
बेळगाव : भुतरामनहट्टी येथील कित्तुर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला वनमंत्री ईश्वर बी खांड्रे यांनी आज भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांची अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले.
हिवाळी अधिवेशनादरम्यान आजच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत बेळगावच्या प्राणिसंग्रहालयातील 31 काळवीटांच्या मृत्यू बाबत गंभीर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. त्याचबरोबर वन्य प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे आणि लसीकरण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
प्रधान मुख्य वनसंरक्षक मीनाक्षी नेगी, पी.सी. रे आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta