
बेळगाव : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समिती नेते व कार्यकर्त्यांची पोलीस प्रशासनाने धरपकड केल्याने त्यांचे संतप्त प्रतिसाद महाराष्ट्र उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही राज्यातील बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर शिवसेना ठाकरे गट आणि कन्नड संघटनांकडून निषेध करण्यात आले. आजपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी बेळगाव सुवर्णसोध येथे होत आहे. त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कालपर्यंत प्रशासनाने मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना बेळगाव आतील व्हॅक्सिन डेपो येथे महामेळावा आयोजित करण्याची तोंडी सूचना केली होती परंतु आज पहाटेपासूनच बेळगावसह खानापूर येथील नेत्यांची पोलीस प्रशासनाने धरपकड करून अटक सत्र चालू केले व नियोजित व्हॅक्सिन डेपो स्थळी नेत्यांना व कार्यकर्त्यांना जाण्यास मज्जाव केल्याने बेळगावसह सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे. याचेच उत्तर म्हणून कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर एसटी डेपो जोरदार निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला. आज कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे कर्नाटक -महाराष्ट्र बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोल्हापुरात कर्नाटकच्या बस अडवून निषेध नोंदविण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात जाणाऱ्या बस वाहतूक तात्पुरत्या बंद केल्या आहेत. निपाणी बस डेपोपर्यंत कर्नाटकची बस सेवा सुरू आहे. अनेक बसेस निपाणी बस डेपोमध्ये थांबून आहेत. त्यामुळे प्रवाशांसह नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र सीमेवर पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोल्हापुरात शिवसेना ठाकरे निषेध करण्यात आला आणि कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात निदर्शने करत कर्नाटक डेपोच्या बस रोखून धरण्यात आल्या. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर बस स्थानकात आंदोलन छेडण्यात आले तर कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अथणी येथे महाराष्ट्राच्या बस अडवून निषेध व्यक्त केला. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे शिवराम गौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या अडवून निषेध व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta