
बेळगाव : चर्मकार समाजाने उद्या बुधवारी ‘चलो सुवर्णसौध’ची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य चर्मकार संघ बंगळूर आणि जिल्हा विभागाच्या वतीने बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चर्मकार समाज बांधवांसाठी श्री शिवशरण हरळय्या विकास निगमची स्थापना करण्यात यावी व या निगमद्वारे स्वतंत्र आर्थिक मदत देण्यात यावी लिडकर निगमवर चर्मकार समुदायांच्या समाज बांधवांची अध्यक्ष आणि संचालक पदी नेमणूक करावी तसेच चप्पल दुरुस्ती करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी मंजूर करावे. जीवन विमा निगम आणि वस्ती सुविधा पुरविण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह शिवशरण हरळय्या विकास निगमद्वारे स्वतंत्र आर्थिक मदत देण्यात यावी. चर्मकार समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने सरकारने नामनिर्देशित स्थान देऊन चर्मकार समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यात यावे. यासह अन्य मागण्यांसाठी चर्मकार समाज आंदोलन करणार आहे. या आंदोलनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समगार (चर्मकार) हरळय्या संघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश काळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta