
बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या प्रकरणात अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून धाबा मालकावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
देसुर क्रॉसजवळील जगदंब धाब्याचा मालक संतोष मरगाळे (वय 40) याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगावच्या दक्षिण ग्रामीण भागात राहणारी आणि टिळकवाडी भागातील नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय युवतीला तिच्या कॉलेजमधील दोघा युवकांनी बाहेर फिरायला जाऊया असे सांगून नेले. हे चौघेही बेळगाव–खानापूर मार्गावरील देसुरजवळील एका धाब्यावर गेले. तेथे एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मागील महिन्यातील असून 22 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता.
या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणातील दोन युवकांना अटक करून त्यांची पॉक्सो अंतर्गत कारवाई केली असून त्यांना आधीच कारागृहात पाठविण्यात आले आहे. आता बलात्कारासाठी रूम उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून धाबा मालकालाही जेलची हवा खावी लागली आहे.
बेळगाव शहर परिसरात अशा अनेक प्रकरणांमध्ये बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये रूम किंवा खोली उपलब्ध करून देणारे अडचणीत सापडत आहेत गेल्या वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.
Belgaum Varta Belgaum Varta