
बेळगाव : येथील भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 56+ वजन गटात राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून ब्रांझ पदकाची मानकरी ठरली आहे. अलीकडे ही स्पर्धा हैदराबाद येथे पार पडली होती. तिच्या यशाबद्दल आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव श्री. विनोद दोड्डण्णावर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले, वरिष्ठ शिक्षक श्री. एम. बी. बखेडी तसेच पीई श्री. पी. वाय. कामल यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.
याचबरोबर कुमारी नेत्रा पत्रावळीनेही या राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत भाग घेतला होता. या दोन्ही डी.वाय.सी. भरतेश स्कूलच्या विद्यार्थिनी असून डी.वाय.ई.एस. (DYES) बेळगाव, कर्नाटक येथील मुख्य प्रशिक्षिका रोहिणी पाटील तसेच खूतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta