
बेळगांव : हासन येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळूर पब्लिक स्कूल आयोजित विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुरस्कृत 36 व्या विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा अनगोळ शाळेच्या भावना भाऊ बेरडे हिने 1 रौप्यपदक, 1 कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
17 वर्षाखालील मुलींच्या गटात लांबउडीत भावना बेरडे हिने 4.69 लांबउडी घेत कांस्यपदक पटकाविले या गटात दक्षिणक्षेत्राच्या लक्षा रेड्डी हिने 4.97 इतक अंतर उडी घेत सुवर्ण तर पश्चिमपूर्व क्षेत्राच्या रितिका प्रजापतीने 4.91 इतकी उडी घेत रौप्यपदक पटकाविले तर तिहेरी उडीत भावना बेरडे. हिने 9.78 इतकी उडी घेत रौप्यपदक पटकाविले आहे.
तिला स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य मुखतेश बदेशा, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, मंगळूर पब्लिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रराज यांच्या हस्ते पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
भावना बेरडे हिला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta