


बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्सचे तब्बल ३५ सभासद दिनांक १२ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कोल्हापूर–धनबाद एक्सप्रेसने मथुरा–वाराणसी येथे होणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन गोल्डन जुबिली समारंभासाठी भव्य उत्साहात रवाना झाले.
हे कन्व्हेन्शन १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून, बेळगावच्या प्रतिनिधींची ही उपस्थिती विशेष ठरणार आहे.
कन्व्हेन्शनपूर्व भेटीदरम्यान सर्व सभासद आयोध्या राम मंदिर, काशी येथील विश्वेश्वर व काळभैरव मंदिर, आग्रा येथील ताजमहाल व फोर्ट, प्रयागराजमधील त्रिवेणी संगम, तसेच दिल्लीतील लाल किल्ला व अक्षरधाम मंदिर या महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत.
या संघात फेडरेशनचे युनिट डायरेक्टर शिवानंद हिरेमठ यांच्यासह संजय पाटील, उमेश पाटील, अरुण काळे, जयंत पाटील, वाय. एन. पाटील, विजय पाटील, अशोक हलगेकर, अनंत कुचेकर, मुकुंद महागावकर, मधु बेळगावकर, अरविंद देशपांडे, अरविंद पालकर, अनंत कुलकर्णी यांचा समावेश आहे. तसेच महिला सभासद सौ. सुवर्णा काळे, विमल पाटील, धनश्री महागावकर आणि अनिता पाटील ह्याही या यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावचे हे प्रतिनिधीमंडळ गोल्डन जुबिली सोहळ्यात शहराची छाप उमटवणार असून, या संपूर्ण यात्रेबद्दल ग्रुपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta