Saturday , December 13 2025
Breaking News

विमान प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका; डॉ. अंजलीताईंच्या तत्परतेने वाचला जीव!

Spread the love

 

नवी दिल्ली : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज गोवा–दिल्ली इंडिगो विमान प्रवासादरम्यान आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर एका परदेशी तरुणीचा जीव वाचविला.

गोव्यावरून दिल्लीकडे जात असताना अचानक विमानातील एका परदेशी तरुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ती बेशुद्ध पडली. या घटनेमुळे विमानात एकच गोंधळ उडाला. मात्र त्याच वेळी विमानात प्रवास करत असलेल्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी तत्काळ पुढे येत त्या तरुणीची तपासणी केली. नाडी तपासून त्यांनी कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (CPR) उपचार करून तरुणीला शुद्धीवर आणले.

सुमारे अर्ध्या तासानंतर त्या तरुणीला पुन्हा झटके येऊन ती बेशुद्ध पडली. अशा गंभीर परिस्थितीतही डॉ. अंजलीताईंनी आपला वैद्यकीय अनुभव पणाला लावून पुन्हा एकदा तिला शुद्धीवर आणले. त्यानंतर गोवा ते दिल्ली असा सुमारे दोन ते अडीच तासांचा संपूर्ण विमान प्रवास डॉ. अंजलीताईंनी त्या तरुणीच्या शेजारी उभे राहून तिची सतत देखरेख आणि सेवा करत पूर्ण केला.

दिल्ली विमानतळावर विमानाचे भूस्पर्श होताच वैमानिक व विमानसेविकांच्या समन्वयाने आधीच बोलावून ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून त्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अंजलीताईंच्या या समयसूचक आणि मोलाच्या रुग्णसेवेबद्दल वैमानिक तसेच सहप्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे विशेष आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार

Spread the love  बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *