
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शाळेत एका विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकास एका प्रभावी मंत्र्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळेच “त्या” शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, असा गंभीर आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला.
बेळगुंदी शाळेतील मुख्याध्यापकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेली तक्रार दाखल झाल्यानंतर त्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी बेळगाव येथे यासंदर्भात बोलताना माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले की, बेळगुंदी शाळेतील मुख्याध्यापकाने लैंगिक छळ केल्याचे सिद्ध झाले असतानाही, पोलिस त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. राज्याच्या महिला मंत्र्यांच्या मतदारसंघातच अशी घटना घडली आहे. यात राजकारण बाजूला ठेवून पीडित विद्यार्थीनीला न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. ‘हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि तो बेळगाव तालुकावासीयांची मान खाली घालणारा आहे. आमच्याही घरात मुली आहेत. त्यामुळे यात राजकारण करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. विद्यार्थीनीचा छळ करणाऱ्या नराधमावर कोणतीही कसलीही भीडभाड न ठेवता कठोर कारवाई करण्यात यावी. काँग्रेस सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली असून, त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,’ असे त्यांनी म्हटले.
Belgaum Varta Belgaum Varta