
बेळगाव : कडोली मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या विद्यमाने रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी ४१ वे कडोली मराठी सहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी टेम्भूर्णी, सोलापूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. महेंद्र कदम यांची निवड झाल्याचे मराठी साहित्य संघांचे अध्यक्ष शिवाजी कुट्रे यांनी जाहीर केले.

सोमवार (दि.१५) झालेल्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीत संमलेनातील सत्रे, येणारे साहित्यिक व संमेलनाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी विलास बामणे, किशोर पाटील, शिवाजी कुट्रे, बसवंत शहापूरकर, भरमाणी डोंगरे, शिवराज कालकुंद्रीकर, अरुण पाटील, तानाजी कुट्रे, गिरीधर गौंडवाडकर, मोहन पाटील, किरण होनगेकर व किरण पवार यांनी संमेलन यशस्वी करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. यावेळी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta