
बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आणि मातोश्री सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम. डी. चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून दहावीच्या विद्यार्थ्यांची उजळणी करवून घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
यावर्षीही या व्याख्यानमालेचे आयोजन हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे करण्यात आले असून या व्याख्यानमालेची सुरुवात रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी मराठी विषयापासून होणार असून सी. वाय. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर २८ डिसेंबर २०२५ रोजी विषय कन्नड शिक्षक श्री. संजीव कोष्टी, ४ जानेवारी २०२५ विषय विज्ञान शिक्षक सौ. सविता पवार, ११ जानेवारी २०२६ विषय समाजशास्त्र शिक्षक श्री. इंद्रजीत मोरे १८ जानेवारी २०२६ विषय गणित शिक्षक श्री. आर पी पाटील आणि २५ जानेवारी २०२६ विषय इंग्रजी शिक्षक सुनिल लाड हे मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अधिक गुणवत्ता प्राप्त करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगुले आणि सचिव डी. एम. चौगुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४४८४८७५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta