
बेळगाव : हलगा गावाच्या ऐतिहासिक निर्णयाला आता सुरुवात झाली असून बुधवार दिनांक 17 पासून सायंकाळी सात वाजता भोंगा वाजल्यानंतर “ना टीव्ही, ना मोबाईल फक्त अभ्यास आणि संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हलगा ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी गणपती, गणपत मारिहाळकर, विलास परीट, भुजंग बिळगोजी, चारुकिर्ती सैब्बन्नावर, बाबू देसाई, अप्पाजी चौगुले, अनिल शिंदे, दयानंद शिंदे, मलाप्पा कालींग, मनोहर संताजी, सुजाता कामानाचे, प्रिया गौरकाचे, यांच्या शुभहस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील अग्रंण धुळगाव या खेड्याचा आदर्श घेऊन हलगा ग्रामपंचायतने हालगा गावामध्ये दररोज सायंकाळी बुधवार दिनांक १७ पासून या उपक्रमाला सुरुवात आली. वाढते तंत्रज्ञान हे फायद्याची की तोट्याचे परंतु माणसाच्या जीवनात याचा वापर किती आणि आपण त्यावर किती नियंत्रण ठेवतो हे प्रत्येकाचे नियोजन वेगवेगळ्या असते. परंतु एका गावाने सामूहिक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना व नागरिकांना चांगल्या सवयी लावण्यासाठी एक गावचा आदर्श घेऊन कर्नाटक राज्यामध्ये हलगा गावाने पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामुळे या उपक्रमाचे स्वागत विद्यार्थी तसे नागरिकांतून उत्कुर्ष प्रमाणात करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. ग्रामपंचायत परिसरात उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी गजपती होत्या. उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर निवृत मुख्याध्यापक भुजंग बेळगोजी, चारुकीर्ती सैब्बन्नावर, आप्पाजी चौगुले, गणपत मारिहाळकर, जोसेफ फर्नांडिस, दीपा घोरपडे, मनोहर संताजी, विलास परीट, शिवाजी संताजी, आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कृष्णा संताजी, पिराजी मोरे, शिवाजी संताजी, धाकलू बिळगोजी, कृष्णा कणबरकर, सुकुमार बेल्लद, पिराजी बिळगोजी, सोमाना परीट, शिवाजी कालींग, सुजाता कामानाचे, सारिका येळ्ळूरकर, प्रिया गौरकाचे, विना घोरपडे, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta