
बेळगाव : ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन 18/12/2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वाजता प्रमुख पाहुणे मा. श्री. राजू भातखांडे (प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक), सन्माननीय पाहुणे मा. श्री. जयदेव मनोहर देसाई (ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे (सदस्य) तसेच ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे सचिव मा. श्री. संजीव नेगिनाळ यांच्या उपस्थितीने झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या अश्विनी चंद्र शेखर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व प्रभावी संचलन सादर केले, त्यांचा संघभावना व शिस्त दिसून आली. प्रमुख पाहुण्यांनी संचलनाची सलामी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
वेगवेगळ्या वयोगटांसाठी धावण्याच्या शर्यती, रिले शर्यत, लांब उडी, फुटबॉल, क्रिकेट तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उत्कृष्ट क्रीडास्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. शिक्षकांसाठी आयोजित विशेष खेळांनी कार्यक्रमात आनंद आणि उत्साह वाढवला.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने व राष्ट्रगीताने करण्यात आला. हा क्रीडा दिनाचा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला व सर्वांसाठी आनंददायी व अविस्मरणीय आठवणी देऊन गेला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक प्रज्वल अनोजी व ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वर्गाने विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केला
Belgaum Varta Belgaum Varta