Thursday , December 18 2025
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘प्लास्टिकला पर्याय’, ‘प्लास्टिक वापरावर पुनर्विचार’ अंतर्गत जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आज पंत बाळेकुंद्री या गावात Extension Activity अंतर्गत पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी “Re-think Plastic” अशी सूचवली होती.

या उपक्रमामध्ये प्राध्यापक वर्गातून उपक्रमाचे को-ऑर्डिनरेटर डॉ. महेश भानुशाली, डॉ.प्रसन्ना सुतार व डॉ.डी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्म. तसेच एम्.फार्मसीचे विद्यार्थी यांच्या सहभागातून प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम, मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तसेच प्लास्टिकऐवजी वापरता येणारे पर्यायी साहित्य याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या प्रसंगी कॉलेज ऑफीस स्टाफ मधून श्री. अनिल बडमंजी आणि श्री. राहूल लंगरकांडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी पोस्टर्स, प्रत्यक्ष संवाद व उदाहरणांच्या माध्यमातून कापडी पिशव्या, कागदी साहित्य, धातू व काच वस्तूंचा वापर याबाबत जनजागृती केली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा त्याग करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असा संदेश यावेळी देण्यात आला.

ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. अशा प्रकारचे उपक्रम समाजामध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरतात, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

ज्ञान मंदिर इंग्लिश माध्यम शाळेचा क्रीडा महोत्सव उत्साहात

Spread the love  बेळगाव : ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन 18/12/2025 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *