Thursday , December 18 2025
Breaking News

सीमाभागात निघणार मराठी सन्मान यात्रा : युवा समिती सीमाभाग राबवणार उपक्रम

Spread the love

 

लढा नाहीतर गुलामीची सवय होईल, होणार लोक चळवळ

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागची बैठक आज मराठा मंदिर येथे संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, बैठकीच्या सुरवातीला पत्रकार परिषद पार पडली, बैठकीच्या प्रारंभी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यानंतर बैठकीला सुरवात होऊन बैठकीत शुभम शेळके यांनी संपुर्ण सीमाभागत मराठी सन्मान यात्रा काढण्यात यावी आणि प्रवाहातून बाहेर गेलेल्या युवकांना किंवा मराठी भाषिकांना लढ्याच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करूया अशी संकल्पना मांडली,

गजानना शहापूरकर यांनी राष्ट्रीय पक्षातील लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने आपल्या मतदारांकडे मराठीत अर्ज देऊन सेवा देत आहेत त्याच पद्धतीन प्रशासकीय पातळीवर मराठीसाठी का आग्रह धरत नाहीत, मराठी नगरसेवकांनी मराठी भाषेसाठी प्रयत्न करावे नाहीतर जाब विचारला जाईल, असे मत व्यक्त केले.

राजू पाटील यांनी मराठी सन्मान यात्रेला अनुमोदन देताना संघटीतपणे मराठी सन्मान यात्रा यशस्वी करुया असे मत व्यक्त केले.

रमेश माळवी यांनी मराठी सन्मान यात्रेला अनुमोदन दिले.
मोतेस बारदेसकर फक्त निवडणुकीत मराठी भाषेचा वापर न‌ करता कायम स्वरुपी मराठी भाषेत व्यवहार चालावे यासाठी प्रयत्न करावे असे सुचवले.

धनंजय पाटील यांनी एकविस जानेवारीच्या न्यायालयाच्या तारखेत कोणतीही बाधा येऊ नये किंवा त्यांचा विपरीत संदेश जाऊ नये यासाठी मराठी सन्मान यात्रा ही एकविस जानेवारी नंतर घेण्यात यावी, तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, घटक समित्या तसेच समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सन्मान यात्रेची माहिती देऊन तारीख ठरविण्यात येईल,असे मत व्यक्त केले आहे.

तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बेळगावात व्हावे यासाठी माणगी करण्याचे एक मताने ठराव संमत करण्यात आला.

आभार प्रदर्शन सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले.

यावेळी अशोक घगवे, शिवाजी हावळानाचे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सचिन दळवी, सागर कणबरकर, इंद्रजित धामणेकर, रणजित हावळानाचे, निलेश काकतकर, सुरज जाधव,साहिल तिनेकर, राहुल बेनाळकर, श्री जाधव, कुणाल जाधव, रोहित जाधव, ओंकार जाधव, निरंजन जाधव, गणेश मोहिते, श्रीकांत नांदूरकर, विनायक मजुकर, राजू पावले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्ञान मंदिर इंग्लिश माध्यम शाळेचा क्रीडा महोत्सव उत्साहात

Spread the love  बेळगाव : ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन 18/12/2025 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *