

बेळगाव : श्री समादेवी मंगल कार्यालय येथे श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव या संस्थेची नवनियुक्त कार्यकारिणीची प्रथम बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे उपस्थित होते. अध्यक्षांनी समाजाच्या सचिव पदी विनायक शहापूरकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला विश्वस्त सुधीर मदली यांनी अनुमोदन दिले. व एक मताने त्यांची सचिव पदी निवड करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांतर्फे नवनिर्वाचित सचिव तसेच सभासदांचा स्वागत तसेच सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष राहुल गावडे, विश्वस्त राकेश कलघटगी, राहुल कलघटगी, अमोल नार्वेकर, अमित गावडे, चंदन मुरकुंबी, योगेश गावडे, मिलिंद नार्वेकर, आनंद गावडे, अजित गडकरी, गोविंद बापशेठ, साईप्रसाद कडतुरकर, राकेश बापशेठ, राकेश असूकर, प्रसाद निखागेँ, सागर मनोळकर, सचिन कुडतुरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta