

बेळगाव : शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणा-या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या ‘बी. के. मॉडेल हायस्कूल’ने आपल्या यशस्वी वाटचालीची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. शताब्दी महोत्सव सप्ताहा अंतर्गत आज शुक्रवारी सायंकाळी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हास्य कलाकारांच्या हास्यांच्या फवाऱ्यातून शताब्दी महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला.
शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कार्यदर्शी श्रीनिवास शिवणगे, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, शैला चाटे, रवी घाडगे यांच्यासह विनोद वीर गंगावती प्राणेश बसवराज महामुनी तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मधुकर गुंडे नटी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी यांनी स्पाई शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक श्री वन निवास शिवणगे यांनी केले तर हास्यविरांचा परिचय तुकाराम भास्कर यांनी करून दिला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांनी आपल्या खुसखुशीत शैलीने समाजप्रबोधनात्मक विनोदातून उपस्थितांना हास्याची मेजवानीच दिली. बसवराज महामुनी यांनी पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या जीवनावरील किस्से आणि आपल्या जीवनात कार्यक्रमादरम्यान घडलेल्या विनोदी किसने सर्वांना खळखळून हसविले. शाळेचे माजी विद्यार्थी आणि हास्य कलाकार मधुकर गुंडेनटी यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकावर आधारित मजेदार किस्सा सांगत कार्यक्रमाच्या प्रारंभीच हास्य मैफिलीची नांदी दिली. तीनही हास्यवीरांनी जीवनातील विसंगतीवर मार्मिक बोट ठेवत सर्वांची मने जिंकली.


Belgaum Varta Belgaum Varta