

बेळगाव : बेळगावच्या हलकारे भगिनींनी 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये दमदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत सुनिधी हलकारे आणि समृद्धी हलकारे यांनी पोहण्याच्या विविध स्पर्धांमध्ये एकूण पाच पदकांची कमाई केली. या दोघींनी मिळून 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली.
200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत विशेष उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळाला. U-17 वयोगटात समृद्धी हलकारे हिने सुवर्णपदक पटकावले, तर U-19 वयोगटात सुनिधी हलकारे हिने रौप्यपदक जिंकत दोन्ही भगिनींनी वेगवेगळ्या वयोगटात एकाच व्यासपीठावर स्थान मिळवले.
ही हलकारे भगिनींची सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदकांची कामगिरी असून, त्यांनी याआधीही सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. तसेच, दोघींनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 (गया, बिहार) येथे कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
बेळगावच्या स्विमर्स क्लब ऑफ बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब, के.एल.ई.च्या ऑलिम्पिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात सराव करत असलेल्या या भगिनींना प्रशिक्षक उमेश कालघटगी आणि त्यांच्या समर्पित प्रशिक्षक संघाचे मार्गदर्शन लाभत आहे.


Belgaum Varta Belgaum Varta