
बेळगाव : दि. 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या 6व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचा आज उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या विविध राज्यांमधून एकूण सुमारे 1200 हून अधिक कराटेपटू सहभागी झाले आहेत.
या कराटे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. रमाकांत कोंडुसकर, डॉ. संजय सुंठकर, शशिकांत नाईक, सुदर्शन प्रभू, शेहराबानू हुक्केरी, अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, सरचिटणीस जितेंद्र काकतीकर तसेच अनेक मान्यवर व कराटे प्रशिक्षक उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना श्री. रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले की, आजच्या पिढीसाठी कराटेचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. तर डॉ. संजय सुंठकर यांनी युवकांनी वाईट व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात सहभागी होऊन आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारावे, असे आवाहन केले.

Belgaum Varta Belgaum Varta