Tuesday , March 3 2026
Breaking News

काकतीमध्ये जनजागृती रॅली उत्साहात

Spread the love


बेळगाव : काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेतर्फे आयोजित झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि प्राणीपक्षी वाचवा जनजागृती रॅली आज सकाळी उत्साहात पार पडली.
काकती येथील ‘हा माझा धर्म’ या पशु बचाव संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी आयोजित या रॅलीमध्ये गजानन गवाणे, ज्योती गवी, सिद्धगौडा सुनगार, रुद्रेश, कामांना चौगुले, सुरज कडोलकर आदींसह डिव्हाइन हेल्पिंग हँड्स ग्रुप, वनखाते, ग्रा. पं. सदस्य, माजी जि. पं. सदस्य आणि पशू बचाव संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे काकती येथील मराठी माध्यम शाळा, कन्नड माध्यम शाळा, उर्दू माध्यम शाळा आणि मराठा मंडळ काकती शाखेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी देखील रॅलीत सहभागी होते. काकती गावातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि प्राणीपक्षी वाचवासंदर्भातील घोषणा देत निघालेल्या या रॅलीत हातात फलक धरून सहभागी झालेले विद्यार्थी -विद्यार्थिनी सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *