
बेळगाव : धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हात उचलल्याच्या घटनेचा निषेध करत भीमप्पा गडाद यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसच्या एका मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान नारायण बरमणी यांच्यावर हात उचलून त्यांना धमकावले होते, जे कायद्याचे उल्लंघन आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलल्यास दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद असतानाही पोलिसांनी याप्रकरणी स्वेच्छा दखल घेऊन गुन्हा दाखल केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे दुखावलेल्या बरमणी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्यांची समजूत काढून त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. आयपीएस किंवा केएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या पदावर दिलेली नियुक्ती नियमबाह्य असून, कनिष्ठ न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta