
बेळगाव : म्हैसूर येथे आयोजित जागतिक शेतकरी परिषदेसाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाचा बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात भीषण अपघात झाला. जालिकोप्प गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन उलटून ३० हून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत.
म्हैसूरमधील कार्यक्रमासाठी बैलहोंगल तालुक्यातील गरजू येथील शेतकरी अत्यंत उत्साहाने निघाले होते. मात्र जालिकोप्प गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याशेजारी उलटले. या अपघातात ३० जण जखमी झाले असून त्यापैकी नऊ जणांच्या हात, पाय आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तातडीने बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, किरकोळ जखमींवर बैलहोंगलच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा वेग जास्त असल्याने किंवा नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta