
बेळगाव : समर्थ नगर चौथा क्रॉस, वॉर्ड क्रमांक १५ येथे नवीन पेव्हर रोडच्या बांधकामाच्या कामाचा शुभारंभ पूजाविधीने करण्यात आला. सदर रस्ता विकासकाम नगरसेविका सौ. नेत्रावती विनोद भागवत यांच्या निधीतून करण्यात येत आहे.
गेल्या तब्बल २० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाची प्रतीक्षा नागरिक करत होते. अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या विकासकामाबद्दल नागरिकांनी आमदार अभय पाटील तसेच नगरसेविका सौ. नेत्रावती विनोद भागवत यांचे आभार मानले. दिलेली आश्वासने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी नेतृत्वाचे विशेष कौतुक केले.
भूमिपूजन कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच समाजसेवक विनोद भागवत आणि परिसरातील मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. विकासकाम सुरू झाल्याने समर्थ नगर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
Belgaum Varta Belgaum Varta