
बेळगाव : महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना बेळगाव जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यात येत असेल तर मला आज का अडविण्यात आले नाही ? असा सवाल ज्येष्ठ विधीतज्ञ पद्मश्री उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
उज्वल निकम आज बेळगावातील ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी उज्वल निकम यांना, खासदार धैर्यशील माने यांनी आपणाला बेळगाव येण्यापासून रोखण्यात आल्याबद्दल संसदेच्या सभापतींकडे केलेल्या तक्रारींची माहिती दिली. महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना बेळगाव येण्यापासून अनेक वेळेला रोखण्यात येते याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावर बोलताना उज्वल निकम म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना बेळगाव येण्यासाठी रोखण्यात येते याची मला कल्पना नाही. खासदार धैर्यशील माने यांनी संसदेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असेल तर त्याची मी माहिती घेईन. खासदार धैर्यशील माने यांच्या बरोबरही या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta