
टिळकवाडी : आश्रय कॉलनी, नानावाडी येथील श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या वार्षिक ‘अय्यप्पा स्वामी महोत्सवा’चा समारोप येत्या रविवारी (ता. २८) विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात रविवारी (ता. २१) ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर दररोज सकाळी उषा पूजा, सात ते अकरा या वेळेत विशेष पूजांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच ते सात यावेळेतही विशेष पूजाअर्चा करण्यात येत होती. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग महोत्सवात पहायला मिळत आहे.
शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच ते सात या वेळेत अर्चना होणार असून, साडेपाच वाजल्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी साडेसहा वाजता मिलिटरी महादेव मंदिरापासून रथावरून तालपोली मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर रात्री साडेआठ वाजता कन्नूर
व केरळ येथून आलेल्या भक्तांची चंडमेळा मिरवणूक होणार आहे. रविवारी (ता. २८) महोत्सवाचा
समारोप होणार असून, सकाळी सहा वाजता उषा पूजा, साडेदहा ते बारा या वेळेत पडी पूजा आणि साडेबारा वाजल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री अय्यप्पा स्वामींचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन ‘अय्यप्पा सेवा समिती ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta