
बेळगाव : येळ्ळूरमध्ये म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत ते दोन्ही गट एक करा अन्यथा आम्ही समिती सोडून आमचा पर्याय निवडू असा थेट इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतील युवा वर्गाने नेत्यांना दिला आहे.
येळ्ळूरमध्ये सध्या समितीचे दोन गट सक्रिय आहेत. यामुळे येळ्ळूर मधील समितीच्या युवा कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झालाय की, आम्ही कोणत्या समितीकडे राहायचं. यासाठी आज गावातील म. ए. समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन समिती नेत्यांना आवाहन केले आहे की, येळ्ळूरमध्ये दोन समिती कार्यरत आहेत त्या एक करा अन्यथा आम्ही तिसरा पर्याय निवडू. त्याचे परिणाम येत्या ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीत भोगावे लागतील, असा थेट इशारा युवकांकडून देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta