Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर समितीचे दोन्ही गट एक करा अन्यथा पर्याय निवडू; समितीच्या युवा कार्यकर्त्यांचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूरमध्ये म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत ते दोन्ही गट एक करा अन्यथा आम्ही समिती सोडून आमचा पर्याय निवडू असा थेट इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतील युवा वर्गाने नेत्यांना दिला आहे.

येळ्ळूरमध्ये सध्या समितीचे दोन गट सक्रिय आहेत. यामुळे येळ्ळूर मधील समितीच्या युवा कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न निर्माण झालाय की, आम्ही कोणत्या समितीकडे राहायचं. यासाठी आज गावातील म. ए. समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन समिती नेत्यांना आवाहन केले आहे की, येळ्ळूरमध्ये दोन समिती कार्यरत आहेत त्या एक करा अन्यथा आम्ही तिसरा पर्याय निवडू. त्याचे परिणाम येत्या ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीत भोगावे लागतील, असा थेट इशारा युवकांकडून देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *