
बेळगाव : दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी येथील के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर येथे बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने 6 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आदी विविध राज्यांतील 1200 हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत कृष्णा देवगाडी याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ₹25,000 हजार रुपये रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कृष्णा देवगाडी याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले असून बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष श्री. गजेंद्र काकतीकर आणि सचिव जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्याच्या या यशाबद्दल कराटे क्षेत्रातून तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta