Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनतर्फे डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे व ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बाल एकांकीकेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगावच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ४.३० वा. करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या बालकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. डॉक्टर शिवाजी दादा कागणीकर हे बेळगाव परिसरातील सर्वोदयी गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी बेळगावच्या ग्रामीण भागात अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवून अनेक गावांचा कायापालट केला आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, सेंद्रिय शेती, झाडे लावणे, श्रमिकांना रोजगार मिळवून देणे, रात्र शाळा, कलिका केंद्रे, जनजागरण संस्थेच्या माध्यमातून केलेली विविध कामे, बायोगॅस प्रकल्प, दारूबंदी, बालविवाह रोखण्यासाठीचे प्रयत्न. अशी विविध कामे ते करत आहेत. या कामांसाठी त्यांना आजवर विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. कर्नाटक शासनाचा मानाचा देवराज अर्स पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, गदग व राणी चन्नम्मा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी त्यांना देण्यात आली आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेशी त्यांचा स्नेह दृढ असून मुलांच्या सोबत ते विविध पर्यावरण पूरक उपक्रम व विविध शिबिरांचे आयोजन करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या वयाची ७५ वर्षे ही पूर्ण केली आहेत. या सर्व गोष्टींच्या व कार्याच्या सन्मानार्थ मराठी विद्यानिकेतनतर्फे शिवाजी दादांचा सहृदय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला बेळगाव परिसरातील पर्यावरण प्रेमी तसेच पुरोगामी, कष्टकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *