बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या छत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या जागतिक स्थरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
गेल्या छत्तीस वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले असून फेडरेशन सहाचे अध्यक्ष म्हणून गोवा आणि कर्नाटकातील जायंट्स वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक विशेष समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अध्यक्षा शाईना एन सी यांनी २०२२-२०२३ साठी पुन्हा निवड केली आहे.
मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत वेगवेगळ्या समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
यावेळी सुध्दा कर्नाटकात जायंट्सची सामाजिक चळवळ वाढविण्याची जबाबदारी मोहन कारेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे सर्व स्तरातून मोहन कारेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Check Also
बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
Spread the love बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …