Tuesday , March 3 2026
Breaking News

नूतन जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी स्वीकारला पदभार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक यावेळी उपस्थित होते.

सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना रामराजन म्हणाले की, बेळगाव मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी सरकारने आपल्यावर सोपविली आहे. समर्थपणे काम करायचे आहे. प्रशिक्षणार्थी असताना आपण पाच दिवस बेळगावला आलो होतो. हुबळी धारवाडचे पोलीस उपायुक्त म्हणूनही आपण सेवा बजावली आहे. त्यामुळे या परिसराबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना आहे. कोणत्याही घटनेनंतर एफआयआर दाखल होणे आपण गरजेचे समजतो. एफआयआर दाखल करूनच कायद्याच्या मार्गाने तपास करणे आपण पसंत करतो. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. पोलीस ठाण्यात समस्यांचे निवारण झाले नाही तर अशा लोकांनी आपल्याकडे यावे आपल्याला भेटण्यासाठी कोणाच्या शिफारसीची गरज नाही. पोलीस आपली जबाबदारी पार पडतील. नागरिकांनाही जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे असे आवाहन रामराजन यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *