Monday , September 21 2026
Breaking News

विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचाराविना मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : 15 दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा उपचाराविना आज शुक्रवारी सकाळी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत पावलेल्या युवकाचे नांव प्रमोद नागेश मनवाडकर (वय 30, रा. रामनगर, पहिला क्रॉस कंग्राळी खुर्द) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कर्जाच्या नैराशेमुळे सदर तरुणाने आपले जीवन संपवले. प्रमोद याने गेल्या रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले. सदर प्रकार उशिराने घरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रमोद याला सायंकाळी 6 वाजता तातडीने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हॉस्पिटलमध्ये प्रमोद याचा जीव वाचवण्यासाठी गेले 15 दिवस डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते.

तथापि त्यांच्या प्रयत्नांना यश न येता दुर्दैवाने आज शुक्रवारी सकाळी प्रमोद मनमाडकर याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहित मोठी बहीण आणि लहान भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *