Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगावात १३० कोटीतून होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

Spread the love


बेळगाव : बेळगावात ४ एकर प्रशस्त जागेत १३० कोटी रुपये खर्चातून किडवाई कॅन्सर संस्था हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बंगळूरच्या किडवाई संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी सांगितले.
बेळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सी. रामचंद्र म्हणाले, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर येथे किडवाई संस्थेची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या खास प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यानी बेळगावला किडवाई कॅन्सर हॉस्पिटल मंजूर केले आहे. त्याच्या सुसज्ज इमारतीची कोनशिला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते पुढील महिन्यात बसविण्यात येणार आहे. येत्या २ वर्षांत सुसज्ज इस्पितळ रुग्णांच्या सेवेत दाखल होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावात सुरु होणाऱ्या किडवाई कॅन्सर हॉस्पिटलमुळे बेळगावसह ७ जिल्ह्यांतील कॅन्सर रुग्णांची तसेच शेजारील राज्यातील रुग्णांची सोय होणार आहे. १३० कोटी रुपये खर्चातून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात येईल. आरोग्य सेवा क्षेत्र अधिक बळकट करण्यात येईल असे आ. पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *