Tuesday , March 3 2026
Breaking News

खादरवाडीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावात रस्ता निर्माण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह सुरू केला आहे.

खादरवाडीत कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जलजीवन मिशनच्या पाईपलाईनचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. यामुळे असलेल्या चांगल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक आमदारांच्या भावाने दडपशाही करून रस्ता बांधणीसाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन बळकावली असून, शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला जात आहे, असे ग्रामस्थांनी म्हटले. या विरोधात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या आंदोलनात राकेश पाटील, राजेश पाटील, विशाल पाटील, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, भाऊ डोळेकर, अरुण माळी, बाळू पाटील, जगू डोळेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *