बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने बसुर्ते येथे सरकारी मराठी प्राथमिक शाळेला 4ु10 फुटाचे 7 ग्रीन बोर्ड वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने 60 गावांतील 400 वर्ग खोल्यांना ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य साबना तळवार यांच्या अनुदानातून हे बोर्ड वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, भाजपा राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. ग्रामीण मंडळमधील निष्ठावंत व त्यागमय जीवन जगणार्या कार्यकर्त्यांमुळेच असे उपक्रम तडीस नेण्यास मदत मिळते. ग्रामीण भागातील शाळांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने कार्यकर्ते कार्यरत आहेत, कोरोना काळामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन कार्य केले आहे. विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शाळा सुधारणा समिती, आणि विद्यार्थ्यांचे पालक अशा सर्वांनी एकत्र येऊन शाळेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दिशेने कार्य करूया असे ते म्हणाले.
याप्रसंगी सरकारी मराठी प्राथमिक शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र हुदेंलवाडकर, ग्राम पंचायत सदस्य श्री. नेताजी बेनके, श्री. दत्ता बेनके, ग्राम पंचायत सदस्या श्रीमती लक्ष्मी कुराडे, शिक्षिका श्रीमती एस. एन. पाटील व श्रीमती अनुराधा तारिहाळकर, शिक्षक श्री. नामदेव पाटील तसेच सुरज सुतार, पवन देसाई, ताळोबा घुमटे, निवृती मोरे, महेंद्र नाईक, शिवाजी घुमटे, विलास हुंदेलवाडकर, गळगु बेनके, मिथिल जाधव, यतेश हेब्बाळकर, लक्ष्मण गोजगेकर व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव पाटील सरांनी तर आभार प्रदर्शन अनुराधा तारीहाळकर यांनी करुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
Check Also
विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या 55 व्या वर्षपूर्ती निमित्त शोभायात्रेचे आयोजन; प्रसिद्ध गायिका बेला शेंडे प्रमुख आकर्षण
Spread the love बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करीत असलेल्या एसपीएम …