Tuesday , March 3 2026
Breaking News

लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची

Spread the love

 

मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण

बेळगाव : सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे प्रतिपादन बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. पत्रकार संघातर्फे मंगळवारी (६ जानेवारी) पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

पत्रकार दिनानिमित्त संघातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की यांना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रारंभी धुराजी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांच्या हस्ते धुराजी यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच धुराजी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून पत्की यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे धुराजी यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. समाजात होणा-या अन्यायाविरोधात पत्रकार आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असतात. युद्धकाळात तर जीव धोक्यात घालून ते लोकांपर्यंत माहिती पोहचवतात. हे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे.

बालमुकुंद पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यवाह महेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले.
पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *