




बेंगळुरू : गेल्या 2021 सालातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवेबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
उगादी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेंगलोर येथे आज सकाळी मुख्यमंत्री सुवर्णपदक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील 135 पोलीस व अधिकार्यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक शिन्नूर यांच्यासह बेळगावच्या सहाहून अधिक अधिकारी व पोलिसांना सुवर्णपदकाचा सन्मान मिळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta