Saturday , March 7 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीतील दुहीवर तोडगा काढा : मध्यवर्ती समितीकडे निवेदन

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीमध्ये मागील काही दिवसांपासून दोन गट सक्रिय होऊ पहात आहेत. संघटनेतील दुही मोडीत काढण्यासाठी मध्यवर्ती समितीने पुढाकार घेऊन एकी करावी अशा आशयाचे निवेदन येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या एका गटाने दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी आम्ही रीतसर सोशल मीडिया, वृत्तपत्राद्वारे आवाहन करून येळ्ळूर विभाग कार्यकारणीच्या पुनर्रचनेसाठी 8 ते 10 बैठका घेऊन सविस्तर चर्चा व चाचपणी करून येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना 31 मार्च 2025 रोजी माजी अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला गावातील सर्व आजी -माजी लोकप्रतिनिधी, नेते व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे माजी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून बैठकीला उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. यानंतर म. ए. समितीचे माजी कार्याध्यक्ष दुधापा बागेवाडी व माजी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर व काही नेते व कार्यकर्त्यांनी आपली वेगळी चूल मांडून गावामध्ये वार्ड सभा घेत गावात संभ्रम निर्माण करून आपली समिती मोठी हे दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. याबद्दल गावातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकी करण्यासाठी प्रयत्न केले तरी एकी झाली नाही. याबाबत तालुका म ए समिती, शहर म ए समिती यांना सुद्धा भेटून याबद्दल कल्पना देण्यात आली होती तरी यावर अद्याप तोडगा निघाला नाही. म्हणून आज येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे मध्यवर्ती म. ए. समितीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. कृपया याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, उपाध्यक्ष मनोहर अ. पाटील, परशराम घाडी, लक्ष्मण मेलगे, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, सचिव राजू उघाडे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *