Saturday , November 7 2026
Breaking News

बेळगांवचे फुटबॉल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

Spread the love

 

बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे उदयोन्मुख फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल मुल्ला तसेच सेंटपॉल शाळेचा फुटबॉल खेळाडू इशान देवगेकर हे खेळाडू पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
कोडगु विराजपेट येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगांव जिल्हा संघाने उपविजेतेपद पटकाविले होते. यात सरकारी शाळा विद्यानगर बंगळुर विजेता ठरला होता.
आता 12 ते 16 जानेवारी दरम्यान पानिपत हरियाणा येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघात सोफिया एन एस, जीवन एस एन, चेतना आर एन, स्वरूप सुरद, श्रेयस बिर्जे, मोहम्मद अफनान, कृतिक नायक, बी वरुण कार्तिक, समृध्द कलबुर्गी, मुकुल अँथोनी के, पुंडलिक चंद्दसार, श्रेयस कारवी, गणेश विभूती, बालाजी भावी, ध्रुव हालनावर, अब्दुल मुल्ला, जीवधन पावशे, इशान देवगेकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे तर संघाचे कोच शांती एस कुमार, सरकारी शाळा विद्यानगर बंगळुर, व्यवस्थापक संदेश बी एल, मडिकेरी, जनरल मॅनेजर डॅनी इरापा सी यू विराजपेट कोडगु हे रवाना झाले आहेत.
संत मीरा शाळेच्या अब्दुल व जीवधन पावशे या खेळाडूंना क्रिडाशिक्षक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन तर इशान देवगेकर याला अँन्थोनी डिसोजा व बाळेश यांचे मार्गदर्शन लाभत आहे. संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे प्रोत्साहान तर जिल्हाशिक्षणअधिकारी लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल, पीईओ जहिदा पटेल यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *