Wednesday , March 4 2026
Breaking News

मुतगे येथे 10 रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान

Spread the love

बेळगाव : मुतगे (ता. जि. बेळगाव) येथे श्री हनुमान यात्रेनिमित्त श्री हनुमान कुस्ती कमिटी, गाव सुधारणा मंडळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने रविवार दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. जक्कन तलाव येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. भोलु पंजाब (पंजाब केसरी) विरुद्ध अक्षय शिंदे (पुणे), दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. कार्तिक काटे वि. पै. संजय कुमार (हरियाणा), तिसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. संगमेश बिराजदार वि. पै. नारायण (सांगली) यांच्या रंगणार आहे.
पहिल्या तीन क्रमांकाच्या प्रमुख कुस्त्यां व्यतिरिक्त मुतगे कुस्ती मैदानात पै. रोहीत कंग्राळी वि. पै. सुनिल कवटेपिटान, पै. किरण कोगे वि. पै. किर्ती कुमार (कार्वे), पै. विक्रम शिनोळी वि. पै. गणेश (कोल्हापूर), पै. पवन चिकदीनकोप्प वि. पै. परशुराम नंदीवाळे, पै. सुशांत कंग्राळी वि. पै. विजय चिमड, पै. संकल्प (कंग्राळी) वि. पै. पंकज (चापगांव) पै. प्रविण (निलजी) वि पै. अजिंक्य (कोल्हापूर) आदी एकूण लहान मोठ्या 50 कुस्त्या होणार असून विजेत्या मल्लांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *