Wednesday , March 4 2026
Breaking News

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे : ॲड. प्रसाद सडेकर

Spread the love

 

बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे महत्त्वाचे वर्ष आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी, बाकीच्या सर्व गोष्टींना फाटा देऊन अगदी मन लावून अभ्यास करावा आणि चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे. परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही, जी बालगोपाळ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, तिचा उपयोग करून घ्यावा, असे विचार ॲड. प्रसाद सडेकर यांनी व्यक्त केले.
पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या एस. एस. एल. व्याख्यानमालेचे उद्घाटन करून, आपल्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.
पुढे बोलताना आपल्या भाषणात सडेकर म्हणाले, ‘मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण मराठी माध्यामातून शकतो याचा न्यूनगंड बाळगू नये. कारण आज उच्च पदावर गेलेले अनेकजण मातृभाषेतून शिकवणच पुढे गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मवीर विद्यामंदिरच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळराव पाटील हे होते.
सुरुवातीला ॲड. प्रसाद सडेकर आणि निवृत्त सुभेदार विठ्ठल पाटील यांच्या हस्ते कुंडितील रोपाला पाणी घालून या व्याख्यान मालेचे उद्घाटन करण्यात आले, तर व्याख्यान मालेचे आयोजक प्रा. डॉ. गोपाळराव पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रा. डॉ. गोपाळराव पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ”विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, त्यासाठी आपणाला झेपणारा आणि आवडीच्या शाखेत प्रवेश घ्यावा. त्यासाठीची माहिती माहिती आतापासूनच विद्यार्थ्यांनी मिळवावी, सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या एस. एस.एल सी. व्याख्यानमालेतील मराठी विषयाचे व्याख्यान शिवाजी हसनेकर यांनी घेतले. यापुढे प्रत्येक रविवारी एकेक विषयाचे व्याख्यान होणार आहे.
शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर भोसले यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *