
बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर हल्ला करून तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे घडली आहे.
शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमध्ये रणकुंडये गाव हादरले आहे. नागेश भाऊसाहेब पाटील वय 32 असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयत नागेश यांचे भाऊ देखील गंभीर जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार शनिवारी रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर समोर लावलेल्या दुचाकीची मोडतोड केली. त्यावेळी नागेश याच्यावर धारधार शस्त्रांनी वार केला. या घटनेत नागेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नागेश याचा भाऊ मोहन याच्यावर देखील हल्ला करण्यात आला असून तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. मोहनवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
मयत नागेश हा नेव्हीत सेवेला होता नोकरीचा राजीनामा देत तो एक खाजगी कंपनीत कामाला होता. हा खून कुणी केला याचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी भेट देत पहाणी केली असून पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदीश्वर अधिक तपास करत आहेत.
रणकुंडये खूनाचे नेमकं कारण काय? मध्यरात्री घरावर हल्ला करून खून करणारे ते दोघे कोण याचा तपास पोलीस घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta