Tuesday , March 3 2026
Breaking News

क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस माध्यमातून 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान बेल्कॉन व ऑटो एक्सपो

Spread the love

 

बेळगाव : क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंटस यांच्यावतीने बेल्कॉन 2026 बांधकाम, प्राॅपर्टी, बांधकाम साहित्य इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान येथील सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच सदर प्रदर्शन अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित अशा वातानुकूलित शामियान्यात संपन्न होणार आहे अशी माहिती बेळगाव क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर तसेच यश इव्हेंटचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना युवराज हुलजी म्हणाले, कर्नाटक राज्यात बेंगलोर शहरानंतर बेळगावात अशा प्रकारचे भव्य रिऐलिटी, इंटिरियर्स आणि बांधकाम साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या बेळगाव शहराचा झपाट्याने विकास होत आहे. बांधकाम क्षेत्राला अन्य साधारण महत्त्व आले आहे. अशावेळी ग्राहकांना एकाच छताखाली आपल्या स्वप्नातील हक्काच्या घराच्या सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याची एकाच छताखाली माहिती मिळावी. याच उद्देशाने बेळगाव क्रेडाई वतीने बेळगावात सलग आठव्या वर्षी बेल्कॉन प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.

इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर म्हणाले, तब्बल एक लाख स्क्वेअर फुट जागेत बेल्कॉन आणि ऑटो एक्सपो प्रदर्शन संपन्न होत आहे. प्रदर्शनात बेल्कॉनच्या 150 स्टॉल्समध्ये बांधकाम क्षेत्रातील फ्लॅट, बंगला, विटा, वाळू, स्टील प्लायवूड, लाइटिंग, गृह सजावट, लिफ्ट यासारख्या सर्व प्रकारच्या आणि महत्त्वपूर्ण साहित्य सुविधांचे प्रदर्शन आणि माहिती बेळगावच्या ग्राहकांना मिळणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत बांधकाम क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कार्यशाळा चर्चासत्र, स्पर्धा आणि बेळगाव डेव्हलपमेंट काॅन्क्लेव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचाही मोठा लाभ बेळगावकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील, ओरियनिस, जीएम लाइटिंग, विशाल इन्फ्रास्ट्रक्चर, व्हिव्हा, श्रीराम इनवोकेशन, साईराज कन्स्ट्रक्शन, चैतन्य डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, वात्सल्य कन्स्ट्रक्शन यांचे प्रायोजक स्वरूपात महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्रेडाईचे वरिष्ठ पदाधिकारी आनंद कुलकर्णी म्हणाले, या प्रदर्शनात स्थावर मालमत्ता सल्लागार आणि बांधकाम व्यावसायिक सहभागी होतील. ग्राहकांना या प्रदर्शनात आकर्षक ऑफर आणि सवलतींमध्ये उपलब्ध असलेले प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, नाविन्यपूर्ण बांधकाम साहित्य आणि आधुनिक इंटीरियर डिझाइन संकल्पनांसह बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. याबाबत माहिती दिली. राजेंद्र मुतगेकर यांनीही बेळगाव शहरातील विकासासाठी क्रेडाईच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चैतन्य कुलकर्णी, सुधीर पनारे यांनीही यावेळी समायोजित विचार मांडले.

यश इव्हेंटचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी ऑटो एक्सपो संदर्भात बोलताना म्हणाले, सलग सातव्या वर्षी ऑटो एक्सपोचे आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनात ऑटो एक्स्पोतील शंभर स्टॉल्सवर विविध नामवंत कंपन्यांच्या कार, टू व्हीलर, ई-व्हेईकल्स वाहने व वाहनांचे स्पेअर पार्ट, विंटेज कार, स्टंट ड्राइविंग आदींचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. बेळगाव क्रेडाई आयोजित बेल्कॉन 2026 आणि यश इव्हेंटच्या ऑटो एक्सपोला बेळगावकरांचा यावेळीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी क्रेडाईचे महेश फगरे, ज्ञानेश्वर सायनेकर, सचिन बैलवाड यश इव्हेंटचे अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम यांच्यासह प्रायोजक प्रतिनिधी व अन्य सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *