Tuesday , March 3 2026
Breaking News

समाज सारथी सेवा संघाच्या अध्यक्षपदी प्रा. सी. एम. गोरल तर सेक्रेटरी पदी बी. एन. मजुकर

Spread the love

 

इतरही पदाधिकाऱ्यांची निवड

येळ्ळूर : नेताजी भवन येळ्ळूर येथे समाज सारथी सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळीराम देसूरकर होते. संघाच्या ध्येय धोरणाची चर्चा झाल्यानेतर सर्वानुमते 11 सदस्यांची कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी बी. एन. मजुकर, उपसेक्रेटरी डॉ. तानाजी पावले, खजिनदार अभियंता हणमंत कुगजी, हिशोब तपासणीस निवृत मुख्याध्यापक गोविंद काळसेकर यांची तर संपर्क अधिकारी म्हणुन हणमंत पाटील, राजु पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल व रमेश जयराम धामणेकर यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संघाच्या वतीने गावातील शैक्षणिक, सामाजिक, समस्ये बरोबर महिला सबलीकरण, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि गावात वाढलेली व्यसनाधिनता यावर काम करण्यासाठी ही संस्था स्थापन केली असल्याचे यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये सतिश देसूरकर यानी सांगितले. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे प्रकाश अष्टेकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बैठकीचे सुत्रसंचलन अनिल हुंदरे यानी व आभार संजय गोरल यानी मानले. यावेळी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *