बेळगाव : पूर्वीपासूनच खो- खो हा खेळ येळ्ळूर गावची परंपरा आहे आणि ही परंपरा विद्यार्थ्यांनी सातत्याने सुरू ठेवावी. यशस्वी होण्यासाठी बौद्धिक व शारीरिक क्षमता ही तेवढीच महत्त्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सदृढ राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे गौरव उद्गार संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर श्री चांगळेश्वरी देवी फोटो पूजन सौ. अक्षता बिजगरकर, सौ. लक्ष्मी लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती मूर्ती पूजन सौ. सुवर्णा जाधव, सौ. विमल कुगजी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फोटो पूजन सौ. राजनंदिनी पाटील, सौ. मलप्रभा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रायमरीचे मुख्याध्यापक श्री. आय. बी. राऊत यांनी करून उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर संचालक, श्री. नरेंद मजुकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. क्रीडा ध्वजाचे पूजन आणि ध्वजारोहण सचिव प्रसाद मजूकर व श्री. नागराज रतन यांच्या हस्ते झाले. तसेच क्रीडा साहित्य पूजन सौ रेखा कामानाचे, सौ. राजश्री मुचंडी, सौ. राजश्री कुगजी यांच्या हस्ते करण्यात आले. म्हैसूर व गदग येथे झालेल्या मिनी ऑलम्पिक खो-खो स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचे दोन विद्यार्थी श्रीओम रामदास धुळजी इयत्ता सातवी व सोनाक्षी नारायण मुचंडी इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल व त्यांनी स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यानंतर खो- खो स्पर्धांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री. भुजंग पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पूजा हुंदरे, सौ. शालन पाटील, सौ. लक्ष्मी तारीहाळकर, रेश्मा पिसाळे शिक्षणप्रेमी प्रतिक्षा येळूरकर, सौ. संगीता बिर्जे, सौ. प्रतिभा बेळगावकर, उद्योजक श्री. गणपती टोपकार, श्री. विजय कनबरकर, श्री. युवराज पाटील, श्री. एकनाथ पाटील ही सर्व मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संजीवनी धामणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दीपा हट्टीकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री. एम. एम. डोंबले, सौ. नंदा मूचंडी, सौ. सारिका पाटील, सौ. स्नेहल मजुकर, सौ. अंकिता पाटील, सौ. आरोही पाटील यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यास हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta